🕒 1 min read
मुंबई : क्रिकेटप्रेमी कधी काय करतील ते सांगता येत नाही. कधी ते मैदानावर सुरक्षारक्षकांना भेदून आपल्या आवडत्या खेळाडूंना भेटायला जातात, तर काही केशरचनेद्वारे, टॅटूद्वारे आपले प्रेम व्यक्त करतात. असाच काहीसा प्रकार यंदाच्या आयपीएलनंतर घडला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले. यानंतर हार्दिकच्या एका बिहारी चाहत्याने अशी गोष्ट केली, त्यामुळे तो चर्चेचा विषय ठरला.
आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सच्या विजयावर बिहारच्या नवादा जिल्ह्यातील एका सलून मालकाने लोकांसाठी केस आणि दाढी कटिंग मोफत केली आहे. गुजरात संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याचा जबरा फॅन असलेल्या रवीने हा अनोखा पुढाकार घेतला, ज्याचे सर्वांकडून कौतुक होत आहे. हार्दिकच्या वेड्या चाहत्यानेही त्याने आपले नाव बदलून रवी पंड्या असे ठेवले आहे.
CHAMPIONS ???? This is for all the hard work we’ve put in! Congratulations to all the players, staff, fans ❤️❤️❤️ @gujarat_titans pic.twitter.com/zEeqdygBEy
— hardik pandya (@hardikpandya7) May 29, 2022
रवीने त्याच्या दुकानात आणि आजूबाजूला पोस्टर लावून ही घोषणा केली. सहसा त्याचे बांधलेले ग्राहक दुकानात येत राहिले, परंतु असे बरेच ग्राहक देखील आले आणि मोफत सेवेचा लाभ घेतला. रवीनेही कोणाला निराश न करता सर्वांची चांगली सेवा केली. एक आठवण म्हणून, रवीने सर्व ग्राहकांना रजिस्टरवर स्वाक्षरी करायला लावली आणि त्याची नोंद ठेवली.
असा रंगला सामना…
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिल्या हंगामात खेळणाऱ्या गुजरात टायटन्सने आयपीएल २०२२ (IPL 2022)चे विजेतेपद पटकावले आहे. सव्वा लाख प्रेक्षकांच्या उपस्थितीत अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सला (GT vs RR) ७ गड्यांनी मात दिली. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने २० षटकात ९ बाद १३० धावा केल्या. हार्दिक पंड्याने संजू सॅमसन, जोस बटलर आणि शिमरॉन हेटमायर या तिघांना बाद करत राजस्थानचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरात गुजरातकडून सलामीवीर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्या यांनी सावध आणि संयमी फलंदाजी केली. १९व्या षटकात गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केले. हार्दिक पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
