🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) अष्टपैलू खेळाडू दीपक चहर विवाहबंधनात अडकणार आहे. दीपक उदया बुधवारी (१ जून) गर्लफ्रेंड जया भारद्वाजसोबत विवाहबद्ध होणार आहे. दीपकचे कुटुंब आज आग्रा ताज शहरात पोहोचले आहे. जया आग्रा येथील रहिवासी आहेत. आज मेहंदी आणि हळदीचा विधी होईल. त्यानंतर बुधवारी विवाहसोहळा पार पडणार आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली लग्नाला पोहोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दीपकने चेन्नईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. याशिवाय रोहित शर्मालाही लग्नाचं आमंत्रण पाठवण्यात आले आहे. .
दीपकने लग्नासाठी आयपीएल संपण्याची वाट पाहिली. अशा परिस्थितीत क्रिकेट जगतातील बडे स्टार्स लग्नाला पोहोचणार हे नक्की. जया ही टीव्ही स्टार सिद्धार्थ भारद्वाजची बहीण आहे. दीपक आणि जया यांची भेट सुमारे वर्षभरापूर्वी मुंबईत एका मित्राच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली जी पुढे प्रेमात बदलली. गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या आयपीएल सामन्यानंतर दीपकने जयाला स्टेडियममध्ये प्रपोज केले होते.
https://www.instagram.com/p/CUuthsjIPx_/
दीपक चहर सध्या दुखापतीमुळे भारतीय संघाबाहेर आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२२ मध्ये खेळू शकला नाही. यामुळेच चेन्नईच्या संघाला यंदाच्या मोसमात नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. आयपीएलच्या अखेरीस तो सीएसकेमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती परंतु एनसीएमध्ये रिहॅब प्रक्रियेदरम्यान तो पुन्हा एकदा दुखापतग्रस्त झाला. त्यामुळेच पुढील काही महिने भारतीय संघात पुनरागमन करणेही त्याच्यासाठी कठीण आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
