Share

IPL 2022 : आकाश चोप्रानं बनवली यंदाची आयपीएल ‘प्लेइंग इलेव्हन’! दिनेश कार्तिक अन् उमरान मलिकला नाही जागा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने आयपीएल २०२२ मधील त्याची सर्वोत्तम इलेव्हन निवडली आहे. चोप्राने निवडलेल्या संघात दिनेश कार्तिक, वानिंदू हसरंगा, उमरान मलिक आणि रशीद खान यांसारख्या चमकदार खेळाडूंना स्थान मिळालेले नाही. चोप्राने नियमांना लक्षात ठेवून आपल्या संघात चार परदेशी खेळाडूंची निवड केली आहे.

आकाश चोप्रा त्याच्या यूट्यूब चॅनलवर इलेव्हन निवडत असताना म्हणाला की, मी जोस बटलरची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड केली. तो म्हणाला ‘जर तुम्हाला सलामीवीर निवडायचा असेल आणि तुम्ही डोळे मिटून विचार केला तर नाव बाहेर येईल ते म्हणजे जोस द बॉस बटलर आहे. बटलर संपूर्ण स्पर्धेत पहिला क्रमांकाचा सलामीवीर राहिला आहे. त्याने अविश्वसनीय काम केले आहे. त्यामुळे मी त्याला यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवडले आहे. केएल राहुलला बटलरचा सलामीचा जोडीदार म्हणून निवडले आहे. चोप्रा म्हणाला, ‘मी केएल राहुलला बटलरसोबत ठेवेन. मी क्विंटन डी कॉक आणि शुभमन गिलचा विचार केला, पण केएल राहुलने दोन शतकांसह यंदाच्या हंगामात ६०० हून अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे बटलरसोबत सलामीसाठी केएल राहुल कायम आहे.’

आकाश चोप्राने तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर राहुल त्रिपाठी आणि हार्दिक पांड्याची निवड केली. चोप्राने हार्दिकला आपल्या संघाचा कर्णधारही बनवले आहे. तो म्हणाला, ‘मी दीपक हुडा आणि राहुल त्रिपाठी यांना तिसऱ्या क्रमांकासाठी निवडले होते.v त्यामध्ये मी राहुल त्रिपाठीची निवड केली कारण ८० टक्के लोकांनी त्यांना मतदान केले आहे. त्यानंतर माझा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट असलेला हार्दिक पंड्या कर्णधार आहे. तो गोलंदाज आणि फलंदाज आहे. तो या संघाचा कर्णधारही आहे.

लियाम लिव्हिंगस्टोन आणि डेव्हिड मिलर दोघेही फिनिशर आहेत. चोप्रा म्हणाला, ‘लियम लिव्हिंगस्टोन नंबर-५ वर निवडला आहे. त्याच्याकडे षटकार मारण्याची प्रचंड क्षमता आहे. यंदाच्या हंगामात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ६ व्या क्रमांकावर दिनेश कार्तिक असू शकतो, परंतु डेव्हिड मिलरची निवड केली कारण यंदाचा आयपीएल हंगाम त्याचा सर्वोत्तम राहिला आहे.

आकाश चोप्राने अष्टपैलू म्हणून आंद्रे रसेलची निवड केली. तो म्हणाला, ‘मी आंद्रे रसेलला सातव्या क्रमांकावर निवडले कारण तो परिस्थितीनुसार खेळू शकतो. माझ्याकडे गोलंदाजीचे कमी पर्याय आहेत असे तुम्ही म्हणू शकता, पण तसे नाही. माझ्याकडे हार्दिक पंड्या आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे दोन खेळाडू गोलंदाजी करू शकतात.’ आकाश चोप्राने गोलंदाजीत आवेश खान, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल यांची निवड केली.

आकाश चोप्राची आयपीएल इलेव्हन – जोस बटलर(यष्टीरक्षक), केएल राहुल, राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मिलर, आंद्रे रसेल, युझवेंद्र चहल, आवेश खान, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!