🕒 1 min read
मुंबई : दिग्गज इंग्लिश फुटबॉल क्लब चेल्सी एफसी (Chelsea FC) हा अमेरिकन उद्योगपती टॉड बोहली यांनी गुंतवणूक फर्म क्लार्कलेक कॅपिटलच्या सहकार्याने विकत घेतला आहे. क्लब विकत घेण्यासाठी १२ दावेदार होते, परंतु बोहली ४.२४ बिलियन पाऊंड म्हणजेच सुमारे ४२ हजार कोटी देऊन क्लबचे नवीन मालक बनले आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी संबंध ठेवल्याबद्दल यापूर्वीचे मालक रोमन अब्रामोविच यांच्यावर बंदी घालण्यापूर्वी क्लब मार्चमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. त्यांनी क्लब विकून कमावलेल्या पैशातून युक्रेनमधील जखमी आणि पीडितांना मदत करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी ते चॅरिटेबल फाऊंडेशन सुरू करणार आहेत.
रशियन उद्योगपती रोमन अब्रामोविच यांनी २००३ मध्ये चेल्सीला सुमारे ११०० कोटींना खरेदी केले होते. त्याच्या मालकीखाली, क्लबने दोन चॅम्पियन्स लीग, ५ प्रीमियर लीग, ५ एफए कप, २ युरोपा लीग आणि तीन एएफएल कप जिंकले. याशिवाय या संघाने सुपर कप आणि क्लब वर्ल्ड कपही जिंकला आहे. अब्रामोविच यांनी या कालावधीत १३ व्यवस्थापकांची नियुक्ती केली.
Club Statement.
— Chelsea FC (@ChelseaFC) May 7, 2022
चेल्सीवर बंदी असतानाही, त्यांना सामना खेळण्यासाठी विशेष सरकारी परवाना देण्यात आला होता, जो ३१ मे रोजी संपत आहे. नवीन मालक म्हणून नियुक्त झाल्यानंतर टॉड बोहली यांनी म्हटले, “आम्हाला चेल्सी फुटबॉल क्लबचे नवीन संरक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. मालक म्हणून, आमची दृष्टी अगदी स्पष्ट आहेॉ. चाहत्यांना अभिमान वाटावा अशी आमची इच्छा आहे.”
कॅलिफोर्नियातील एका खासगी इक्विटी फर्मने प्रथमच हा संघ विकत घेतला आहे. ४८ वर्षीय बोहली सात वेळा बेसबॉल वर्ल्ड सीरीज चॅम्पियन एलए डॉजर्स, यूएस महिला बास्केटबॉल संघ लॉस एंजेलिस स्पार्क्स आणि एनबीए फ्रेंचायझी लॉस एंजेलिस लेकर्स यांचे सह-मालक आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
