Share

चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही – सदाभाऊ खोत

Published On: 

🕒 1 min read

जेजुरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 297वी जयंती आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या अहमदनगरमधील चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. चौंडीत जाण्यापासून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवलं आहे. यानंतर सदाभाऊ खोत यांनी पवार घराण्यावरून जोरदार टीका केली आहे.

सदाभाऊ खोत आणि पोलीस यांच्यात बाचाबाची झाली आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी अडवल्यानंतर राजकीय वाद पेटले आहेत. “चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही, अहिल्यादेवी होळकर ह्यांचं जन्मस्थळ ही कुणाच्या बापाची जहागीर नाही. आम्ही प्रवेश करणारच! हे समाज कंटक राजकारणी आम्हाला का अडवत आहेत हे जनतेला ठाऊक आहे”, असे बोलत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनीही शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. गोपीचंद पडळकर म्हणाले, “मी लहान असल्यापासून चौंडीला अहिल्यादेवींच्या दर्शनासाठी येत आहे. पण आम्हाला अशा रितीने कधी अडवण्यात आले नाही. आज शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आम्हाला रोखण्याचा प्रयत्न होत आहे. शरद पवार यांनी अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमात राजकारण आणले. शरद पवार यांनी आमच्या चार पिढ्या बरबाद केल्या. रोहित पवार हे त्यांचं सुधारित व्हर्जन आहे. आम्ही त्यांना आमच्या मानगुटीवर बसून देणार नाही”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!