Share

पवारांचा शिवसेनेला पाठींबा, संभाजी छत्रपती यांची राज्यसभेची वाट बिकट!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकच जागा आहे. ही जागा निर्वाचित करण्यासाठी आवश्यक नंबर आमच्याकडे आहेत. एक जागा निवडून देऊनही काही मते शिल्लक आहेत. दोन वर्षांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या त्यावेळी सुद्धा एकच जागा मिळत होती. मात्र मी मुख्यमंत्र्यांना दोन जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी विनंती केली. तेव्हा मी व फौजिया खान दोघांच्या जागा होत्या. त्यामुळे शिवसेनेने त्यावेळी माघार घेतली. मात्र पुढच्यावेळी दुसरी जागा ही शिवसेनेला द्यावी ही मागणी त्यांनी केली, ती आम्ही मान्य केली आहे. त्यामुळे एक जागा लढवून उर्वरित मते शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय कोणालाही देऊ शकत नाही. शिवसेना जो उमेदवार देईल त्याला आमचा पाठिंबा असणार आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

याआधी शरद पवार यांनी स्वराज्य पक्षाचे सर्वेसर्वा संभाजी छत्रपती यांना अपक्ष उमेदवार म्हणून पाठींबा देऊ, असे म्हंटले होते. संभाजी छत्रपती यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्याही पक्षाची उमेदवारी न घेता, अपक्ष उमेदवार म्हणून लढवणार असल्याचे जाहीर आहे. संभाजी छत्रपती यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याआधी पाठिंबा दिला जाहीर केला होता. मात्र शिवसेनेकडून संभाजीराजेंना पाठिंब्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याची अट घालण्यात आली आहे. यावर तोडगा म्हणून संभाजी छत्रपती यांनी आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्याचे प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कळवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आता मात्र शिवसेनेचा संभाव्य उमेदवार संभाजी छत्रपती असतील की आणखी कोण, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जर संभाजी छत्रपती राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार असतील तर त्यांच्याकडे निवडून येण्याइतपत संख्याबळ असणार नाही. शरद पवार यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केल्याने आता संभाजी छत्रपती यांची राज्यसभेची वाट बिकट बनली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!