मुंबई : आज पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून शरद पवारांपर्यंत सर्वांचा खरपूस समाचार घेतला आहे. हिंदुत्वावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. मात्र आता त्यावर शिवसेना नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर मिळत आहे. अयोध्या दौऱ्याच्या स्थागितीवरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुन्हा राज ठाकरेंवर वार केला आहे. मनसेचा अयोध्या दौरा हा भाजप पुरस्कृत होता. उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार आहे. अयोध्येत जाण्यापासून राज ठाकरेंना कुणी अडवलं? कोण त्यांच्यावर केसेस करणार? असा सवाल ही त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे. राज ठाकरेंनी हा ट्रॅप असल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना अडकवू देणार नाही म्हणत, हा दौरा स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आता हा ट्रॅप नेमका कोणाचा होता? हा सापळा कशाचा होता? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
संजय राऊत म्हणाले, “तुम्हाला कोणी विरोध करत आहे तर तो विरोध झुगारुन जावा. तुम्ही नेता आहात कोणी एक खासदार विरोध करतो तर एक ठाम भूमिका घ्या. तुम्ही तर दौराच रद्द केला आहे, असे म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना सुनावले आहे. तर उद्धव ठाकरे आमच्या पार्टीचे सेनापती आहेत आमच्यावर जेवढ्या केसेस आहेत तेवढ्या त्यांच्या पार्टीवर नाही, असा जबरदस्त टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
राज ठाकरे निराशेने ग्रासले की असे बोलत असतात. इतर दुकानं चालले नाही म्हणून सोयीनुसार ते भूमिका बदलतातआणि. राज ठाकरे कधी झाले हिंदुत्ववादी? आमच्या हिंदुत्वाला ढोंगी वैगरे बोलणारे आता यांनी शाल कधी पांघरली? आमच्या हिंदुत्वावर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. राज ठाकरेंना समुपदेशाची गरज आहे, उपचाराची गरज आहे, असाही खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
महत्त्वाच्या बातम्या :


