Share

IPL 2022: सामना सोडून कॅमेरामनचा फोकस मैदानातील सुंदर मुलींवर; पाहा VIDEO!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगामातील साखळी फेरीतील फक्त एक सामना आता शिल्लक राहिला आहे. प्लेऑफसाठीचे ४ संघ निश्चित झाले आहेत. दरम्यान प्लेऑफचा चौथा संघ कोणता हे शनिवारी पार पडलेल्या दिल्ली विरुद्ध मुंबई सामन्यातून समोर आले. या रोमहर्षक सामन्यात दिल्लीचा पराभव झाला आणि बंगळुरूचा प्लेऑफमध्ये जाण्याचा रस्ता स्पष्ट झाला. दरम्यान या सामन्यात सर्वांचे लक्ष खेळाडूंच्या खेळाकडे असताना कॅमेरामन मैदानातील सुंदर मुलींना शूट करण्यात व्यस्त होता. दरम्यान यंदाच्या आयपीएलमध्ये अनेकदा कॅमेरामन सामन्यादरम्यान क्यूट मुलींची झलक दाखवत असल्याचे दिसून आले आहे. पण यावेळी असे करताना एका प्रेक्षकाने चक्क कॅमेरामनचाच व्हिडीओ शूटिंग केला आहे.

कॅमेरामनचा कारनामा व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ वेगात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहिल तर जवळपास दोन मिनिटं कॅमेरामन मैदानातील मुलींवर फोकस करत असल्याचे दिसून येत आहे. तो मुलींचे सर्व एक्सप्रेशन कॅमेऱ्यात कैद करत असून मुलीही त्यांच्यावर कॅमेरा असल्याचं कळताच लाजून जातात. ३२ सेंकदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

सामन्याचा निकाल

मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागली. दिल्लीकडून फलंदाजी करताना सलामीवीर डेव्हिड वॉर्नर लवकरच बाद झाला. त्याच्या लागोपाठ मिचेल मार्शही बाद झाला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ २४ धावा, रिषभ पंत ३९ धावा, सरफराज खान १० धावा, रोवमन पॉवेल ४३ धावा, अक्षर पटेल १९ धावांचे योगदान दिले. दिल्लीने ७ गडी गमावून २० षटकांत १५९ धावा केल्या. मुंबईकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराह आणि सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर रमनदीप सिंगने २ गडी बाद केले. डॅनियल सॅम्स आणि मयंक मार्कंडे यांनी प्रत्येकी १-१ एक गडी बाद केला.

दिल्लीने दिलेल्या 159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने पाच गडी राखून हा सामना सहज खिशात घातला. मुंबईकडून फलंदाजी करताना सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा लवकरच बाद झाला. त्यानंतर ईशान किशन ४८ धावा, डेवाल्ड ब्रेविस ३७ धावा, तिलक वर्मा २१ धावा, टिम डेव्हिड ३४ धावा आणि रमणदीप सिंह १३ धावांचे योगदान दिले. टीम डेव्हिडच्या स्फोटक फलंदाजीमुळे मुंबईच्या हातून निसटता विजय मिळवता आला. टीम डेव्हिडने ११ चेंडूत ३४ धावा कुटल्या. यामध्ये त्याने २ चौकार आणि ४ षटकार लगावले. दिल्लीकडून गोलंदाजी करताना एनरिक नॉर्खिया आणि शार्दुल ठाकुर यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले तर कुलदीप यादवला एक गडी बाद करण्यात यश आले.

महत्वाच्या बातम्या:

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!