Share

कोर्टाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असे केवळ मत नमूद केले आहे – शरद पवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik resignation) यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात येत आहे. आता यासर्व प्रकरणावरच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोर्टाने नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध आहेत असे केवळ मत नमूद केले आहे, त्यांचा हा निर्णय नाही. गेली अनेक वर्षे मी नवाब मलिक यांना ओळखतो. माझ्या मनात मलिक यांच्या बद्दल कसलीही शंका नाही. ते अशा चुकीच्या लोकांशी संबंध ठेवतील यावर माझा विश्वास नाही, असे आरोप केले जातात. याचे उदाहरण मी स्वत: आहे. माझ्यावरही असेच अनेक आरोप केले होते. शेवटी ज्यांनी आरोप केले त्यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी विधिमंडळात भाषण करून सांगितले की आम्ही जी टीका करत होतो त्यात काही तथ्य नाही. केवळ विरोधासाठी विरोध म्हणून बोलत होतो. माझी खात्री आहे संपूर्ण चित्र समोर आल्यानंतरच नवाब मलिक यांची बाजू स्पष्ट होईल, असे शरद पवार म्हणाले.

नवाब मलिकांवर काय आहेत आरोप ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डशी निगडित जमीन खरेदी केल्याचा नवाब मलिक यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. दाऊद गँग सोबत नवाब मलिक यांचे संबंध आहेत असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. जवळपास 15 कोटी रुपयांचा आर्थिक व्यवहार दाऊद गँगच्या संबंधीत व्यक्तींशी केला आहे असा ठपका नवाब मालिकांवर ठेवण्यात आला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!