🕒 1 min read
मुंबई : ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालीकेंमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. १८ मे रोजी हृता आणि प्रतिक शाह यांचा विवाहसोहळा पडला आहे. लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी हृता आता मिसेस हृता प्रतिक शाह म्हणून ओळखली जात आहे. लग्नानंतर या दोघांनी हनिमूनसाठी खास ठिकाण निवडलं आहे.
हे जोडपं सध्या इस्तांबूल टर्कीमध्ये हनिमून साजर करत आहे. त्त्यायांनी ठिकाणी फिरताना, तिथल्या जेवणाची चव घेताना, शॉपिंग करताना त्याचसोबत काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी देतानाचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. इस्तांबूल मधील एका बाजारात गेलेला फोटो पोस्ट केला आणि ‘हनिमून’ हा हॅशटॅग दिला आहे.
एका कार्यक्रमामध्ये प्रतिकशी ओळख झाली आणि त्याचवेळी आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. नंतर या मैत्रीच रुपांतर प्रेमामध्ये झालं. गेल्यावर्षी हृताने प्रतीकसोबत सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत नात्याची कबुली केली होती. हृताने प्रियकर प्रतिक शाह याच्यासोबत गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये साखापुडा केला होता.
जाणून घ्या नेमका कोण आहे प्रतिक शाह?
हिंदी मालिकेतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री मुक्ता शाह यांचा मुलगा प्रतिक शाह आहे. बऱ्याच हिंदी मालिकांच दिग्दर्शन प्रतिक करतो. ‘तेरी मेरी इक जिंदगी’, ‘बेहद २’, ‘बहु बेगम’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘एक दिवाना था’ या सर्व मालिकांची नावं प्रतीकसोबत जोडली जातात.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
