🕒 1 min read
जळगाव : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कित्येक वेळा आपली भूमिका बदलली आहे. मग यामध्ये पक्ष स्थापनेपासून मराठीचा मुद्दा असो, त्यांचा लाव रे तो व्हिडीओ असो किंवा भोग्यांचा मुद्दा असो. त्यांच्या नेहमी भूमिका बदलत असतात. नुकताच काढलेल्या भोंग्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंना काही हाती लागले नाही असे बोलत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार टोला लाग्वाला आहे.
सुप्रिम कोर्टाचे आदेशाचे पालन म्हणून आम्ही आंदोलनाची भूमिका घेतली व सरकारला अल्टीमेटम दिला आहे. पण सरकार आमच्याच कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकत आहेत अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर केली होती. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी ते मंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते.
“मनसेचे राज ठाकरे यांनी पक्ष स्थापनेच्या आधी मराठी मुद्द्यावर भूमिका घेत उत्तरप्रदेशवर हल्ला चढविला. त्यानंतर पक्ष स्थापनेच्या वेळी सब को साथ लेगें चलेंगे, नंतर मोदींची प्रशंसा करत भूमिका बदलवली. त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ आणि आता भोंग्याचा मुद्दा अशा पध्दतीने राज ठाकरे यांची भूमिका नेहमी बदलत असते. आता पुन्हा कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकत असल्याच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भोंग्याच्या मुद्द्यावरून आपली भूमिका बदलवली आहे. पण, भोंग्याच्या मुद्द्यावर जनतेच्या मनात स्थान निर्माण करण्यात राज ठाकरे अपयशी ठरले असून ठेंगा मिळाला असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले”.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
