Gulabrao Patil | मुंबई : शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. याच पार्वश्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
“शिंदे गटातील आमदार फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत”, असा गौप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला. यावर शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले की, “ज्यावेळी महाराष्ट्रात सत्तांतर झालं, त्यावेळी आम्ही नवस मागितला होता. जेव्हा महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचं सरकार येईल, तेव्हा आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जाऊ. त्यामुळे आम्ही सगळेजण कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलो.
पुढे ते म्हणाले, “जर कुणी म्हणत असेल की, आम्ही पाच कोटी घेतले, तर ते पाच कोटी मोजायला गेले होते का? असा माझा सवाल आहे. पण माणूस ज्या देवाकडे नवस करतो, तो नवस पूर्ण करण्यासाठी जात असतो, अशी आपली पद्धत आहे.”
नेमकं काय म्हणालेत चंद्रकांत खैरे?
चंद्रकांत खैरे म्हणाले, “शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. “शिंदे गटातील आमदार फुटू नयेत म्हणून या आमदारांना पुन्हा प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत.” एका उद्योगपतीनेच आपल्याला ही माहिती दिल्याचा दावाही त्यांनी माध्यमांशी बोलताना केला होता.
महत्वाच्या बातम्या :
- ENG vs WI | इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी वेस्टइंडीज महिला क्रिकेट टीम जाहीर
- Upcoming Budget Cars | 10 लाखांपेक्षा कमी किमतीत लाँच होऊ शकतात ‘या’ कार
- Maharashtra Winter Update | राज्यात थंडीचा कहर, तर ‘या’ ठिकाणी किमान तापमानाची नोंद
- Government Scheme for Farmers | केंद्राच्या ‘या’ योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळू शकतो 5 पट आर्थिक लाभ
- Nora Fateh I FIFA World Cup मध्ये हातात तिरंगा घेत नोरा फतेहीने केली ‘ही’ चूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

