Gulabrao Patil | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावरुन भाजप (BJP) नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. यावरच आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील नेते गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी भोसले यांना आंदोलन करु नये अशी विनंती केली आहे.
याबाबत बोलताना, उदयनराजेंनी दिलेल्या सुचना सर्वांनी अंमलात आणल्या पाहिजे. ते राजे आहेत. मात्र, मी त्यांना केवळ विनंती करू शकतो की, त्यांनी हे आंदोनल करू नये. आपण सर्व मिळून अशी विधानं रोखण्यासाठी शासनाकडे हा मुद्दा मांडून याबाबत काही कायदा करता येईल का? याचा विचार करण्याची गरज आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
तसेच, हा विषय माझ्या अखत्यारित नाही. मात्र, मी एवढंच सांगेन राज्यपाल असतो किंवा कोणीही असो, शिवाजी महाराजांबद्दल बोलताना सर्वांनी सांभाळून बोललं पाहिजे. ते आपले दैवत आहेत, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, शिवरायांबाबत बोलताना प्रत्येकाने संयमाने, आदरपूर्वक बोललं पाहिजे. शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, याचे भान कोणीही सोडू नये. बाहेरच्या माणसाने इकडे येऊन शिवाजी महाराजांबाबत बोलायचे असेल, तर त्यांनी आधी शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे, अभ्यास करावा, मगच बोलावं, असं देखील गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Sushma Andhare | “आमच्याकडे एक सुशी ताई आहेत…”, सुषमा अंधारेंवर राजू पाटीलांचं टीकास्त्र
- Abdul Sattar | “युती तोडून महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांनी…”, अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांवर पलटवार
- Deepak Kesarkar | “शिवरायांचा अपमान महाराष्ट्र सहन करू शकत नाही, पण…”, दीपक केसरकरांचं विधान
- Udayanraje Bhosale | अखेर राज्यपालांच्या विधानाची चौकशी होणार? उदयनराजे यांच्या ‘त्या’ पत्राची राष्ट्रपतींनी घेतली दखल
- Hemant Godse | संजय राऊतांची टीका हेमंत गोडसेंच्या जिव्हारी लागली, म्हणाले…


