🕒 1 min read
Gulabrao Patil । जळगाव : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. अशातच आज भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं म्हटलंय. त्यांच्या वक्तव्यानंतर विविध स्तरातून त्यांचा निषेध केला जात आहे. अशातच राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनीही प्रसाद लाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत.” त्याचबरोबर पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिला आहे.
दरम्यान, प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस राजकारण करण्याचा प्रयत्न करते, त्याचा मी निषेध करतो. स्वराज्य कोकण भूमी या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट म्हटलं होतं, छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी आणि स्वराज्याची स्थापना कोकणातून झाली. तर, शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं अनावधाने माझ्याकडून बोललं गेलं”, असं प्रसाद लाड म्हणालेत.
नेमकं काय म्हणालेत प्रसाद लाड?
“हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला. रायगडावर शिवरायांचं बालपण गेलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली”, असं प्रसाद लाड म्हणालेत.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Kolhe | “प्रसाद लाड काय ते तुमचे अगाध ज्ञान! चौथीच्या विद्यार्थ्यांकडून…”; अमोल कोल्हे यांचा खोचक सल्ला
- Prasad Lad | शिवरायांवरील विधानानंतर प्रसाद लाड यांनी व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले,
- Sanjay Raut | “भाजपाचं डोकं फिरलंय, शिवरायांची भवानी तलवारच एक दिवस…”; ‘त्या’ प्रकरणावरून संजय राऊत संतापले
- Sanjay Raut | “ते चाळीस आमदार स्वतःला सरकारचे बाप…”; संजय राऊत यांचा जोरदार हल्लाबोल
- Raj Thackeray | प्रसाद लाड यांच्या शिवरायांवरील विधानानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले,
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
