उत्तर प्रदेश : हाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना अयोध्या दौऱ्याचे वेध लागलेले आहे. राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांचा हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे. या आधी पर्यावरण व पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ही आपण अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. याबबत शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आदित्य ठाकरे हे अयोध्या दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार हे उद्या अयोध्या दौरा करणार असल्याची बातमी समोर येत आहे.
आमदार रोहित पवार हे उद्या अयोध्या दौरा करणार असल्याची बातमी समोर येत आहे. उद्या दि. ७ मे रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रोहित पवार हे अयोध्येत असणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर येत आहे. रोहित पवार सध्या हे राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. राजस्थानच्या मेहन्दीपूरच्या बालाजी महाराजांचं दर्शन घेऊन, रोहित पवार हे पुढील प्रवासासाठी उत्तर प्रदेशच्या दिशेने रवाना झाले आहेत.
उद्या सकाळी ते उत्तर प्रदेश राज्यात दाखल झालेले असतील. उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाल्यानंतर रोहित पवार हे अयोध्येकडे निघणार आहेत. आता रोहित पवार यांच्या या अयोध्या दौऱ्याची माध्यमात विशेष चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

