Share

राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी

Published On: 

🕒 1 min read

सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात ६ एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यातल्या शिराळा कोर्टाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. सांगली जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंना अटक करण्याबाबत वॉरंट जारी करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्याविरोधात दुसऱ्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

राज ठाकरे यांच्याविरोधात दुसऱ्यांदा बीडमधील परळी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. १० फेब्रुवारीला कोर्टाने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. राज ठाकरे यांना १३ एप्रिलपर्यंत कोर्टात हजर राहण्यास सांगितले होते. पण राज ठाकरे हजर न झाल्याने परळी कोर्टाने दुसऱ्यांदा राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

राज ठाकरेंवर १४३, १०९, ११७ अशी कलमं लावण्यात आली होती. २००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. यातली विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं हे वॉरंट अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या वॉरंटमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यातील न्यायदंडाधिकाऱ्याने हे अटक वॉरंट जारी केले आहे.

काय आहे प्रकरण?

राज ठाकरे यांना ऑक्‍टोबर २००८ साली मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती, या अटकेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड तसेच दगडफेक झाली होती. परळीतही अशा काही घटना घडल्या होत्या, या घटनेनंतर राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दहा वर्षांपेक्षा जुनं असलेल्या या प्रकरणात आता विशेष हवालदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनावश्यक गर्दी करण्यासोबतच, इतरही अनेक कायद्यांचा उल्लंघन केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर आहे. या प्रकरणाच्या तारखेला राज ठाकरे न्यायालयात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!