मुंबई : मनसेकडून फारतर दोन दिवस आंदोलन झाले. त्याचे पुढे काहीच झाले नाही. आजपर्यंत हाती घेतलेली सगळी आंदोलनं फसलेली आहेत. राज ठाकरे यांनी आजपर्यंत जी जी आंदोलनं केली ती राज्याच्या आणि समाजाच्या नुकसानीची होती. असे बोलत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आणि नेता गॅलरीत फेरफटका मारतोय, वा रे वा…” अशा शब्दात राज ठाकरेंवर जोरदार टीका केली.
“राज ठाकरेंनी आतापर्यंत केलेल्या कोणत्या आंदोलनाला यश आलं…? टोलचं आंदोलन फेल गेलं, परप्रांतीय यूपी बिहारच्या लोकांना हाकलून लावलं. त्यावेळी प्रमुख शहरांमधला कामगार गेल्याने बिल्डर लोकांकडे त्यावेळी कामगार उरले नाही, सगळ्यांची एकच बोंब उडाली. त्यामुळे बोलणारे बोलतात, बोलणारे घरी राहतात, गॅलरीतून फेरफटका मारतात, इकडे तिकडे बघतात.. बिचारे कार्यकर्ते नेत्यासाठी झटतात, काहीतरी आंदोलन करतात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात.. त्यामुळे बोलताना जरा भान ठेवून बोललं पाहिजे, आपल्या बोलण्याचा काय परिणाम होईल, याचा विचार केला पाहिजे”, असाही सल्ला अजित पवार यांनी राज ठाकरे यांना दिला.
‘उत्तर भारतीय चले जाव’ वर अजित पवार काय म्हणाले?
“राज ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी उत्तर भारतीय चले जाव म्हटले होते. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबाद या शहरांमधील बांधकामे बंद पडली होती. बांधकाम व्यवसायिकांना त्यामुळे मजूर मिळेनासे झाले होते. आपल्याकडील लोक काही कामं करतच नाहीत. मजुरांअभावी सर्व बांधकामे ठप्प झाली होती. शेवटी ज्या व्यक्तीने उत्तर भारतीयांना चले जाव म्हटले, त्याला आपली भूमिका बदलावी लागली. राज ठाकरे यांची भूमिका कायम कुठे राहिली”? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या –


