Share

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. राज्‍यात भाजप नेत्‍यांवर हल्‍ले होत आहेत. अशावेळी पोलीस फक्त लांबून पाहण्याची भूमिका घेत आहेत असा आरोप प्रवीण दरेकरांनी थेट केला आहे. तसेच यासह आम्‍हीही जशास तसे उत्तर देवू असा इशाराही त्‍यांनी यावेळी दिला.

शु्क्रवारी रात्री मातोश्री बाहेर मोहीत कंबोज यांच्या गाडीवर हल्ला तसेच आमदार राणा यांना शिवसेनेचे कार्यकर्ते रस्‍त्‍यावर उतरुन अडवत आहेत. राज्यातील पोलीस प्रशासन आणि गृह खाते गप्प का? असा सवाल करत महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करत आहे. राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था ढासळली आहे, असाही आरोपही प्रवीण दरेकरांनी केला आहे.

या पाश्वर्भूमीवर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, “भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याची फार घाई झाली आहे. त्याच्यामुळे ते कोणावर ईडीचे प्रयोग कर, कोणावर सीबीआयचे प्रयोग कर. हे सगळे चालू आहे. त्यातून राज्यात मारामाऱ्या सुरु आहेत, दंगे सुरु आहेत. सरकार अस्तित्वात नाही असे चित्र त्यांना उभे करायचे आहे. भाजपचे लोक सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे त्यांचे प्रयत्न सफल होणार नाहीत. तुम्हाला पुजा अर्चा करायची तर तुमच्या घरात करा किंवा मंदिरात करा. तुमच्या अमरावतीला मंदिर आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली नाही.”

महत्वाच्या बातम्या – 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!