Share

“राणा दाम्पत्य हे भाजपचे भाडोत्री शेंदाडशिपाई” ; नीलम गोऱ्हे यांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

पुणे : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे भाडोत्री टॅक्सी आहेत. हनुमान चालिसा हे श्रद्धापूर्वक करण्याची बाब आहे. परंतु त्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर होत आहे. याला आमचा नेहमीच विरोध असणार आहे. राणा दाम्पत्य हे भाजपचे शेंदाडशिपाई असल्याचे घणाघाती टीका शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्याचे आंदोलन सुरु आहे. त्यामुळे मातोश्री बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नीलम गोऱ्हे बोलत होत्या.

राणा दाम्पत्याच्या हनुमान चालीसा राजकारणावरून असतानाच कालपासून शिवसैनिक मातोश्रीवर ठाण मांडून आहेत. काल काही शिवसैनिकांनी रात्री नवनीत राणा यांच्या घराबाहेर निदर्शने केली. रात्रभर शिवसैनिक नवनीत राणा यांच्या घराबाहेर ठाण मांडून होते. तर काही शिवसैनिक मातोश्रीबाहेर जोरदार घोषणा करत ,राणा दाम्पत्याचा निषेध नोंदवत होते.

राणा दाम्पत्यामुळे मातोश्रीबाहेर तणावाची परिस्थिती निर्माण होऊन, कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!