🕒 1 min read
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर आज (२३ एप्रिल) हनुमान चालीसा पठन करणारच असा इशारा आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दिला आहे. मात्र राणा दाम्पत्याच्या घरासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावरच गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी प्रतिक्रिया देत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे म्हटले आहे. यालाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी ट्वीट करत प्रत्युत्तर दिले आहे.
“राज्याचे गृहमंत्री सांगताहेत की, राज्यात कायदा सुव्यस्था बिघडली आहे. मग तुम्ही काय चपात्या भाजताय? जमत नसेल तर राजीनामा द्या, शिवसेना बसलीच आहे आपला गृहमंत्री बसवायला. स्वतः काम करायचंच नाही आणि जे काही होईल त्याचं खापर कधी मनसेवर कधी आमच्यावर फोडायचं, असा या सरकारचा कारभार आहे!”, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
राज्याचे गृहमंत्री सांगताहेत की, राज्यात कायदा सुव्यस्था बिघडली आहे. मग तुम्ही काय चपात्या भाजताय ? जमत नसेल तर राजीनामा द्या, शिवसेना बसलीच आहे आपला गृहमंत्री बसवायला. स्वतः काम करायचंच नाही आणि जे काही होईल त्याचं खापर कधी मनसेवर कधी आमच्यावर फोडायचं, असा या सरकारचा कारभार आहे!
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 23, 2022
काय म्हणाले होते दिलीप वळसे पाटील?
“त्यांना हनुमान चालीसा वाचायची असेल तर आपल्या घरी वाचावी, दुसऱ्याच्या घरी जाऊन ड्रामा करू नये. त्यांना फारच धर्मा बद्दल आवड असले तर त्यांनी अमरावतीमध्ये आपल्या घरी शांततीत याचे वाचन करावे. मातोश्रीवर जाऊन तिथे विनाकारण शिवसैनिकांचा राग ओढवून घेऊ नये.”, असे वळसे पाटील यांनी म्हटले.
तसेच पोलिसांना काय करायचे आहे, हे त्यांना माहित आहे. पोलिसांना योग्य कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी माझ्या संपर्कात असून परिस्थिती बिघडली असे दाखवण्यात येऊ नये. राणांनी कुणाची तरी सुपारी घेतल्याचे दिसून येत आहे. कुणाच्या तरी सांगण्यावरून हे चालले आहे. मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर या मागील कारण राणा दाम्पत्य असणार. असा इशाराही वळसे पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “…भ्रमातून उद्धव ठाकरेंनी लवकरच बाहेर यावं”, मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्यावर भातखळकरांचा टोला
- “राणा दाम्पत्य हे भाजपचे भाडोत्री शेंदाडशिपाई” ; नीलम गोऱ्हे यांचा टोला
- “तुम्ही तुमच्या लायकीप्रमाणे रहा”- संजय राऊतांचा इशारा
- “शिवसेना पूर्णपणे ट्रॅपमध्ये फसत चालली…”; संदीप देशपांडेंचं ट्वीट
- “…ही हिजडेगिरी बंद करा”- संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
