🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थानविरुद्धच्या (DC vs RR) सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत क्रीजवर उपस्थित फलंदाजांना परत बोलावण्याचे संकेत दिले होते. त्याचवेळी संघाचा आणखी एक खेळाडू शार्दुल ठाकूरही आपल्या कर्णधाराला पाठिंबा देत पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना दिसला. एवढेच नाही तर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक एक पाऊल पुढे टाकत कर्णधाराच्या सांगण्यावरून मैदानात जाऊन अंपायरशी वाद घालताना दिसले. या सर्व वादानंतर आता सर्व सदस्यांना आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने शिक्षा ठोठावली आहे.
ऋषभ पंत, शार्दुल ठाकूर आणि प्रवीण अमरे यांना आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. प्रवीण अमरे यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे, तर दुसरीकडे पंतला सामन्याच्या शुल्काच्या १००% दंड ठोठावण्यात आला आहे. शार्दुल ठाकूरला ५० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सहाय्यक प्रशिक्षक प्रवीण अमरे यांना त्यांच्या मॅच फीच्या १०० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर एका सामन्याची बंदी देखील ठोठावण्यात आली आहे. अमरे यांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल २ चा गुन्हा स्वीकारला आहे.
The IPL has announced sanctions for code of conduct breaches in the #DCvRR match:
– Rishabh Pant fined 100% of his match fee
– Shardul Thakur fined 50% of his match fee
– Pravin Amre, Capitals' assistant coach, banned for one match and fined 100% of his match fee #IPL2022 pic.twitter.com/ajjqex77i4— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 23, 2022
नक्की घडलं काय?
दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या षटकात ३६ धावांची गरज होती. पॉवेलने ओबेड मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूंवर तीन षटकार ठोकले. अशाप्रकारे दिल्लीला शेवटच्या तीन चेंडूत १८ धावांची गरज होती. अशा स्थितीत नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभ्या असलेल्या कुलदीपने अंपायरकडे बोट दाखवून शेवटच्या चेंडूचा रिप्ले पाहण्यास सांगितले कारण तो कमरेच्या वर असता तर तो नो-बॉल होऊ शकला असता. पॉवेलनेही पंचांशी बोलण्यास सुरुवात केली पण मैदानावरील पंचांनी चेंडू वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर पंतने पॉवेल आणि कुलदीपला परतण्यास सांगितले. दरम्यान, सहाय्यक प्रशिक्षक शेन वॉटसनने त्याच्याशी संवाद साधला.
NEWS – Rishabh Pant, Shardul Thakur And Pravin Amre Fined For Code Of Conduct Breach.
More details here – https://t.co/kCjhHXjgoQ #TATAIPL #DCvRR
— IndianPremierLeague (@IPL) April 23, 2022
या घटनेदरम्यान दिल्लीच्या कोचिंग स्टाफचे सदस्य प्रवीण अमरेही मैदानात आले, मात्र पंचांनी त्याला बाहेर जाण्यास सांगितले. राजस्थानचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने कुलदीपला बाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. राजस्थानचा सलामीवीर आणि सामन्यात ११८ धावा करणारा जोस बटलरही पंतशी सीमारेषेजवळ वाद घालताना दिसला.
Watched the match live in stadium!!!!
Crowd goes absolute bonkers over “no ball” and chanted “cheater cheater” in Wankhede!!
The clip of Rishabh Pant post match anger with Umpires#DCvsRR #cheater #RishabhPant #IPL2022 #ipl #noball #RR #wankhede #HallaBol #bcci # pic.twitter.com/RcrBlxVgxE
— Aman Jain (@amanj0104) April 22, 2022
”मी निराश झालो आहे पण याबद्दल काहीही करू शकत नाही. संपूर्ण डगआउट खूपच निराशाजनक होता कारण ते अगदी जवळचे प्रकरण नव्हते आणि ते मैदानावरील लोकांनी पाहिले होते. माझ्या मते, थर्ड अंपायरने या प्रकरणात हस्तक्षेप करून त्याला नो-बॉल म्हणायला हवे होते. अमरे यांना मैदानात पाठवणे योग्य नव्हते, पण आमच्याबाबत जे झाले तेही योग्य नाही. जे काही घडले ते तापलेल्या वातावरणात घडले, पण दोष दोन्ही पक्षांचा आहे. आम्ही खूप निराश झालो होतो, कारण आम्ही संपूर्ण स्पर्धेत खूप चांगले अंपायरिंग पाहिले आहे”, असे पंतने सामन्यानंतर सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
