Share

“…भ्रमातून उद्धव ठाकरेंनी लवकरच बाहेर यावं”, मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्यावर भातखळकरांचा टोला

Published On: 

मुंबई: भाजप नेते मोहित भारतीय  कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी काल (२२ एप्रिल) हल्ला केला. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथून परतताना हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ते कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

“सत्ता गमावण्याच्या भीतीने गारठलेली शिवसेना आता भ्याड हल्ल्यावर उतरलेली आहे. मोहित कंबोज यांच्यावर झालेला हल्ला हा त्याच भीरू मानसिकतेचे लक्षण आहे. असे हल्ले भाजपाला रोखू शकतील या भ्रमातून उद्धव ठाकरे यांनी लवकरच बाहेर यावं.”, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. मात्र या घटनेनंतर भाजपकडून अनेक प्रतिक्रिया उमटत असून ठाकरे सरकारला निशाण्यावर धरले जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!