मुंबई : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. राज्यात भाजप नेत्यांवर हल्ले होत आहेत. अशावेळी पोलीस फक्त लांबून पाहण्याची भूमिका घेत आहेत, असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे.
शुक्रवारी रात्री मातोश्रीबाहेर मोहीत कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. तसेच आमदार राणा यांना शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन अडवत आहेत. यावर राज्यातील पोलीस प्रशासन आणि गृहखाते गप्प का? असा सवाल करत महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपूर्वक भाजपला टार्गेट करत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
आशिष शेलार यांची प्रतिक्रिया –
“शिवसेनेच्या भष्ट्राचाराची पोलखोल आम्ही करत असल्याने शिवसेना आम्हाला टार्गेट करत आहे. आमचे सर्व कार्यक्रम नियमानुसार चालतात. मोहीत कंबोज यांच्या गाडीवर शु्क्रवारी रात्री मातोश्रीबाहेर हल्ला. तुम्हीही गाडीतून कधी तरी एकटे जाल. आम्हीही जशास तसे उत्तर देवू, असेही ते म्हणाले. आम्ही अद्याप राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेरही सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. गृहमंत्रालयाकडून पक्षपातीपणा सुरु आहे”, असा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
राणा दाम्पत्य आणि शिवसेना यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. या परिस्थितीवरून भाजपने राज्यातील कायदा व सुव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ या प्रकरणी राज्यपालांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

