🕒 1 min read
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याच्या भूमिकेला खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी समर्थन केले आहे. त्यातच राणा दांपत्यानी आज २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र त्यापूर्वीच शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या घराबाहेर जाम ठोकला आहे.
“हिंमत असेल तर खाली या”, असे खुले आव्हान शिवसैनिकांनी राणा दांपत्याला दिले आहे. शेकडोंच्या संख्येने राणा दांपत्याच्या घरासमोर शिवसैनिक जमले आहे. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येत आहे. आता या बंदोबस्तात राणा कुटुंब मातोश्रीवर पोहोचणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तर दुसरीकडे रवी राणा यांनी त्यांच्या घरात पूजा करत उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्राला शनी लागला असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राज्याच्या सुख शांतीसाठी आज मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र घराबाहेर शिवसैनिकांनी जाम ठोकला असताना आता राणा दांपत्य बाहेर कसे पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; ‘मातोश्री’ समोर घडली घटना
- “साहित्यकांमध्ये चिअर लीडर्स तयार झालेत,” ; ज्ञानपीठ विजेते लेखक मावजो यांचे परखड मत
- नवाब मलिकांना मोठा धक्का, पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ!
- सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : सदावर्तेंना जामीन, ११५ ST कर्मचाऱ्यांना दिलासा!
- “भाजपला मार्केटिंगसाठी ‘सी ग्रेड’ स्टार बंटी बबली लागतात” ; संजय राऊतांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
