Share

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला; ‘मातोश्री’ समोर घडली घटना

Published On: 

मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी काल (२२ एप्रिल) हल्ला केला. मोहित कंबोज उत्तर भारतीय भवन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असता तेथून परतताना हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. ते कलानगर येथील सिग्नलवर थांबले असता मातोश्री बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी कंबोज यांच्या गाडीवर शिवीगाळ करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान मोहित कंबोज यांच्या गाडीवर हल्ला करताच पोलिसांनी त्या दिशेने धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तर  राज्यात सध्या भोंग्यावरून चांगलेच राजकारण पेटले आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असा संघर्ष आता निर्माण झाला आहे.

तर आज (२३ एप्रिल) खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानबाहेर हनुमान चालीसेचे पठण करणार असल्याने आजही या ठिकाणी संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!