Share

नवाब मलिकांना मोठा धक्का, पुन्हा न्यायालयीन कोठडीत वाढ!

Published On: 

मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारीला अटक केली होती. आता नवाब मलिकांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टानं नवाब मलिक यांना ६ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्यांना आणखी काही दिवस तुरुंगात राहावे लागणार आहे.

नवाब मलिकांच्या अटकेची  कारणे –

दाऊद इब्राहीम टोळी, क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ‘ईडी’ने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ‘ईडी’ने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. दाऊद संबंधित असलेल्या सुमारे ३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध आहे. असे ‘ईडी’ला तपासात आढळले. या कारणाने नवाब मलिक यांच्यावर ‘ईडी’ने अटकेची कारवाई केली.

नवाब मलिक यांनी दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकविली. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्याची किंमत ३०० कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!