Share

“भाजपला मार्केटिंगसाठी ‘सी ग्रेड’ स्टार बंटी बबली लागतात” ; संजय राऊतांची टीका

Published On: 

नागपूर : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हुनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित केला. मात्र यानंतर भोंगा मुद्द्यावरून आता राज्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे शिवसैनिकांना आव्हान देत मुंबईत दाखल झाले आहेत. उद्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी ते मुंबईत पोहचले आहेत. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

हिंदुत्व, रामनवमी, हनुमान चालिसा हे श्रद्धेचे विषय आहेत. ते मार्केटिंगचे विषय नाहीत. बंटी और बबली आले असतील तर आम्हाला काही हरकत नाही. मार्केटिंग करणे हे त्यांचे कामच आहे. भाजपला मार्केटिंगसाठी असे सी ग्रेडचे स्टार लागतात, असे संजय राऊत म्हणाले.

तसेच हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज नाही. श्रद्धा भावनेची गोष्ट आहे. मुंबईत कसे वातावरण आहे हे आता कळेल, असा इशाराही राऊत यांनी दिला. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा इशारा दिला. यानंतर आता पुढे रवी राणा आणि नवनीत राणा काय करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!