Share

सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : सदावर्तेंना जामीन, ११५ ST कर्मचाऱ्यांना दिलासा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या घरावरील झालेल्या हल्ल्याप्रकरणी गुणरत्न सदावर्ते आणि ११५ आंदोलक कर्मचाऱ्यांना अखेर जामीन मिळाला आहे. सदावर्ते यांना ५० हजार रुपये रोख हमी आणि तितक्याच रकमेचा हमीदार तर सर्व ११५ कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

या हल्ल्याप्रकरणात सदावर्ते यांच्यासह अनेक कर्मचारी अडकले होते. कर्मचारी यातून आता सुटले आहेत पण सदावर्ते कोल्हापुरात अडकले आहेत. तिथे त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती आहे.  एसटी कर्मचाऱ्यांचे नेते सदावर्ते आता तरी बाहेर येऊ शकतात का? पुढचा मुक्काम कुठे असेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ –

गुणरत्न सदावर्ते एक झाले की दुसऱ्या गुन्ह्यात अडकत चालल्याचे पाहायला मिळत आहेत. पवारांच्या घरावर जो मोर्चा काढण्यात आला होता. त्याला जबाबदार म्हणून सदावर्ते जबरदस्त अकडलेत, त्यांचे बाहेर पडण्याचे मार्ग कठीण होत चालले आहेत. सातारा कोर्टाने जामीन दिला, पण त्यानंतर कोल्हापुरात त्यांना नेण्यात आले. आता कोल्हापुरात जामीन मिळेपर्यंत अकोला पोलीसही ताबा घेण्यासाठी रांगेत आहेत. अकोल्यात त्यांच्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात सदावर्तेंचाही सहभाग असल्याचा आरोप होत आहे. तर दुसरीकडे सोलापुरातही सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे सदावर्तेंचा पुढील मुक्काम अकोला असेल अशी चर्चा सध्या सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!