लातूर : लातूर येथील उदगीर नगरीत ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दणक्यात सरुवात झाली. छत्रपती शाहू महाराज सभागृहात व डॉ. ना. य. डोळे व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उदघाटन झाले आहे. दरम्यान उदघाट्नच्या कार्यक्रमापूर्वी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी काढण्यात आली. ही ग्रंथदिंडी छत्रपती शिवाजी चौकातून निघाली. यावेळी प्रमुख पाऊणे म्हणून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरीकार दामोदर मावजो यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी आपले परखड मत मांडले.
सत्तेचा माज चढला की निर्बंध लादले जातात अशी टीका त्यांनी यावेळी केली. अशा वेळी साहित्यिक गप्प का बसतात? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला. आज साहित्यिकांमध्ये चिअर लीडर्स तयार झालेत. ते सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक कृतीला गपगुमान प्रोत्साहन देतात, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा ही उपस्थित केला. ‘दिल्ली राईट २०२० : द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकावरील बंदी आणि ‘काश्मीर फाईल्सचा’ मुद्दा ही उपस्थित केला. ते म्हणाले पुस्तकावरील बंदी रास्त होती का ? माझ्या एका मित्राचे पुस्तक जाळूला टाकलं गेलं. एखादं पुस्तक पसंत नाही म्हणून जाळून टाकणं, बंदी आणणं योग्य नाही. असे मावजो म्हणाले.
शरद पवार यांनी यावेळी बोलले, ‘प्रोपोगंडा साहित्य निर्मितीमुळे निरंकुशतेला निमंत्रण मिळत असून, आपल्या देशात असाच विशिष्ट प्रोपोगंडा पद्धतशीरपणे राबवला आहे.’
महत्वाच्या बातम्या :

