🕒 1 min read
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच छत्रपती उदयनराजे (MP Udayan Raje Bhosale) यांनी राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे.
“राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.”, असे ट्वीट खासदार छत्रपती उदयनराजे यांनी केले आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु होत्या. तरीही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रामदास हे महाराजांचे गुरू होते असे वक्तव्य करून शिवप्रेमीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या भावना दुखावल्या आहेत. तरी राज्यपालांनी आपले वक्तव्य त्वरित मागे घ्यावे.
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) February 28, 2022
नेमके काय म्हणाले राज्यपाल?
औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले.
चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
-
जनतेचे मनोबल वाढवणारा योद्धा म्हणून झेलेन्स्की यांचे नाव इतिहासात कोरले जाईल- संजय राऊत
-
श्रीलंकेच्या मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचा सहकारी खेळाडूंना विशेष संदेश म्हणाला…
-
राज्यपालांच्या वक्तव्यावर अतुल लोंढेंचे टीकास्त्र; म्हणाले,“हे लोकं सातत्याने महाराजांचा…”
-
“… त्या भाजप नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- झेलेन्स्की ५६ इंचाची छाती! युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली; संजय राऊतांचा प्रहार

