🕒 1 min read
मुंबई: रशिया-युक्रेन युद्ध पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी आजच्या सामना अग्रलेखातून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडीमीर झेलेन्स्की यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत, तर यावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर टीकेची झोडही उठवली आहे.
आक्रोश करणाऱ्या युक्रेनमागे आज एकही देश उघडपणे उभा राहात नाही.तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी यावर ‘नरो वा कुंजरोवा’ अशी तटस्थ भूमिका स्वीकारली. ज्या तटस्थ भूमिकेबद्दल भाजपचे आजचे पुढारी पंडित नेहरूंच्या भूमिकेला दोष देत होते, त्याच भाजप नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले. अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
झेलेन्स्की हे आज जगाचे नायक बनले आहेत. अमेरिका, चीनसारख्या महासत्ता भूमिका घ्यायला तयार नाहीत. रशियाचे पुतीन लांडग्याप्रमाणे युक्रेनचे लचके तोडत आहेत. जगातले महापंडित, युनो, नाटो हतबलतेने पुतीनने लादलेले युद्ध पाहत आहेत, पण मदतीस कोणी तयार नाही. सर्व आंतरराष्ट्रीय मंच हे षंढांसारखे खाली मान घालून बसले आहेत. झेलेन्स्की हे त्यांच्या परिवारासह पळून जाऊ शकले असते. त्यांनी नकार दिला. त्यांनी स्वत हातात शस्त्र घेतले. त्यांनी त्यांच्या जनतेला आवाहन केले, “ज्यांना शस्त्र हवीत त्यांना शस्त्र मिळतील. मिळेल त्या हत्याराने रशियन फौजांशी लढा.” झेलेन्स्की यांच्या या वक्तव्याने युक्रेनची जनता चैतन्याने भारून गेली. असे कौतुकही संजय राऊत यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“…पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
-
झेलेन्स्की ५६ इंचाची छाती! युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली; संजय राऊतांचा प्रहार
-
IND vs SL : रोहित शर्माने जिंकलेली ट्रॉफी ज्याच्या हाती दिली ; जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती
-
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा…’
- राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, दिला आंदोलनाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
