मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (State Governor Bhagat Singh Koshyari) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे.
“खरा इतिहास माहीत करून न घेता आपला अजेंडा रेटण्यासाठी खोटा इतिहास सांगून छत्रपतींचा अपमान केला जात असेल तर हे नक्कीच निषेधार्ह आहे आणि असं होत असताना गप्प बसणं हे त्याहून अधिक निषेधार्ह आहे. राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून, सर्वांना सोबत घेत आदर्श राज्यकारभार केला. सर्वसामान्य जनतेचं हित, हीच त्यांची निती आणि शिकवण होती.”, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 28, 2022
तसेच “खोटा इतिहास सांगून थोर महापुरुषांचा खरा इतिहास पुसण्याचे प्रयत्न देशात इतरत्र यशस्वी होत असतीलही, परंतु महाराष्ट्रात असले प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत, हे सर्वांनीच लक्षात ठेवावं.”, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
नेमके काय म्हणाले राज्यपाल?
औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले.
चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या:
जनतेचे मनोबल वाढवणारा योद्धा म्हणून झेलेन्स्की यांचे नाव इतिहासात कोरले जाईल- संजय राऊत
श्रीलंकेच्या मालिका विजयानंतर कर्णधार रोहितचा सहकारी खेळाडूंना विशेष संदेश म्हणाला…
राज्यपालांच्या वक्तव्यावर अतुल लोंढेंचे टीकास्त्र; म्हणाले,“हे लोकं सातत्याने महाराजांचा…”
“… त्या भाजप नेत्यांनी युक्रेनप्रश्नी कुंपणावर बसून फापडा खाणेच पसंत केले”, संजय राऊतांचे टीकास्त्र
- झेलेन्स्की ५६ इंचाची छाती! युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली; संजय राऊतांचा प्रहार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

