Share

झेलेन्स्की ५६ इंचाची छाती! युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली; संजय राऊतांचा प्रहार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रशियासारख्या बलाढ्य देशाने युक्रेनवर हल्ला करणे हे शौर्य नसून रशियन आक्रमणापुढे शरण न जाता लढणे हेच खरे शौर्य आहे. या संघर्षात जे तटस्थ राहिले व शब्दांचे बुडबुडे फोडत राहिले, त्यांची नोंद इतिहास ‘डरपोक’ म्हणून ठेवेल. अफगाणिस्तानच्या जनतेला तालिबान्यांपासून वाचवू शकले नाहीत. इराकच्या जनतेला अमेरिकेच्या मगरमिठीतून वाचवू शकले नाहीत. युक्रेनचा एकाकी लढा पाहूनही महासत्ता म्हणवून घेणाऱ्यांच्या मुठी अन्यायाविरुद्ध आवळल्या नाहीत. ही तर आंतरराष्ट्रीय मंचांची नामर्दानगीच आहे. फक्त प्रे. झेलेन्स्की हेच 56 इंचाच्या छातीवर गोळय़ा झेलत लढत राहिले. जग शूरांची आठवण ठेवते. बाकी येतात व जातात. युक्रेन युद्धात सगळय़ाच मर्दाची नाचक्की झाली आहे. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.

रशियासमोर शरणागती पत्करण्यास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (President of Ukraine Volodymyr Zelensky) यांनी नकार दिला आहे. रशियाच्या बलाढय फौजा नागरी वस्त्यांवर बॉम्बहल्ले करीत आहेत. क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांनी युक्रेन रक्तबंबाळ झाले आहे, पण वोलोडीमीर झेलेन्स्की यांनी देश वाचविण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी आतापर्यंत 67 देशांच्या राष्ट्र्प्रमुखांना फोन करून मदतीची याचना केली आहे. त्यात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील आहेत, पण एकही राष्ट्र झेलेन्स्की यांना मदत करायला तयार नाही. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेनही फुसकेच निघाले. बायडेन यांनी दारूगोळा पाठवायला हवा होता, पण बायडेन यांनी झेलेन्स्की यांना फोन करून सांगितले, “विमान पाठवतो, युक्रेन सोडून पळून जा.”

यावर झेलेन्स्की यांनी जगाला बाणेदार उत्तर दिले, “मला पळून जाण्याचा मार्ग नकोय, मला पळून जाण्यासाठी तुमचे विमान नकोय. मला शस्त्र आणि दारूगोळा द्या. मी व माझा देश लढत राहील,” त्यांनी एखाद्या महानायकाप्रमाणे हे विधान फेकले. झेलेन्स्की हे स्वतः हाती शस्त्र घेऊन रणांगणात उतरले आहेत. ते बेडरपणे लढत आहेत. यालाच म्हणतात ५६ इंचाची छाती. अशी कौतुकाची थाप संजय राऊत यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!