🕒 1 min read
मुंबई: लंडनवर हिटलरच्या लडाकू विमानांचा भयंकर बॉम्बहल्ला सुरू असताना चर्चिल निधडया छातीने सैन्यतळांवर फिरत होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (President of Ukraine Volodymyr Zelensky) हे चर्चिलच्याच निर्भयाने बेडरपणे फिरत आहेत. याच बेडरपणामुळे झेलेन्स्की हे जगाचे नायक बनले आहेत. युद्धप्रसंगी पळून न जाता हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरणारा, जनतेचे मनोबल वाढवणारा योद्धा म्हणून त्यांचे नाव इतिहासात कोरले जाईल. असे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
रशियासारख्या बलाढय व साम्राज्यवादी देशाने व पुतीनसारख्या महत्त्वाकांक्षी नेत्याने युक्रेनवर हल्ला करणे हे शौर्य नसून रशियन आक्रमणापुढे शरण न जाता लढणे हेच खरे शौर्य आहे. या संघर्षात जे तटस्थ राहिले व नुसते शब्दांचे बुडबुडे फोडत राहिले, त्यांची नोंद इतिहास ‘डरपोक’ म्हणून ठेवेल. अफगाणिस्तानच्या जनतेला तालिबान्यांपासून वाचवू शकले नाहीत. इराकच्या जनतेला अमेरिकेच्या मगरमिठीतून वाचवू शकले नाहीत. युक्रेनचा एकाकी लढा पाहूनही महासत्ता म्हणवून घेणाऱ्यांच्या मुठी अन्यायाविरुद्ध आवळल्या नाहीत. ही तर आंतरराष्ट्रीय मंचाची नामर्दानगीच आहे. अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.
तसेच युनोपासून नाटोपर्यंत सगळेच जण कुचकामी ठरले. फक्त प्रे. झेलेन्स्की हेच ५६ इंचाच्या छातीवर गोळ्या झेलत लढत राहिले. जग शूरांची आठवण ठेवते. बाकी येतात व जातात. युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दाची नाचक्की झाली आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी झेलेन्स्की यांचे कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“…पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
-
झेलेन्स्की ५६ इंचाची छाती! युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली; संजय राऊतांचा प्रहार
-
IND vs SL : रोहित शर्माने जिंकलेली ट्रॉफी ज्याच्या हाती दिली ; जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती
-
आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा…’
- राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध, दिला आंदोलनाचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
