मुंबई : औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. दरम्यान, राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील (Atul Londhe Patil) यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल लोंढे पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘हे बघा संघी सत्य, हे लोकं सातत्याने महाराजांचा अपमान करतात.’ तसेच माझा एक प्रश्न आहे महाराष्ट्राच्या तमाम शिवप्रेमी जनतेला की भाजप शिवाजी महाराजांचा निवडणुकीत जो वापर करते ते किती योग्य आहे?, असा सवालही अतुल लोंढे पाटील यांनी केला आहे.
हे बघा संघी सत्य हे लोक सातत्याने महाराजाँचा अपमान करतात.माझा एक प्रश्न आहें महाराष्ट्रा च्या तमाम शिवप्रेमी जनतेला की भाजपा शिवाजी महाराजांचा निवडणुकीत जो वापर करते ते किती योग्य आहे? pic.twitter.com/dCIiZZTzUw
— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)???????? (@atullondhe) February 27, 2022
दरम्यान, चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, आणि समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे त्यांच्या आईचे मोठे योगदान असते, तसंच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते.’ तसेच शिवाजी महाराज समर्थांना म्हणाले होते की, तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे, असे राज्यपाल म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या :
- झेलेन्स्की ५६ इंचाची छाती! युक्रेन युद्धात सगळ्याच मर्दांची नाचक्की झाली; संजय राऊतांचा प्रहार
- “…पण लाल किल्ल्यावर शपथ घ्यायचे स्वप्न काही सूटेना”, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला
- IND vs SL : कर्णधार रोहित शर्माने रचला वर्ल्ड रेकॉर्ड , धोनी आणि कोहलीसुद्धा असा पराक्रम करू शकले नाही
- आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर सदाभाऊ खोतांचे टीकास्त्र; म्हणाले,‘मातोश्री’चं नाव दिल्ली ठेवण्याचा…’
- IND vs SL : रोहित शर्माने जिंकलेली ट्रॉफी ज्याच्या हाती दिली ; जाणून घ्या कोण आहे हा व्यक्ती


