🕒 1 min read
औरंगाबाद:पंतप्रधान पदाचा अवमान केल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) आणि आमदार चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वंयरोजगार विभागाद्वारे शहरातील आपापल्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी व्हिडिओ बाबत खुलासा केल्यानंतर हे भाजपच्या या दोन्ही नेत्यांकडून पंतप्रधानपदाची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्रदेश अध्यक्ष योगेश मसलगे यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यात म्हटले आहे, कथित व्हिडिओबाबत प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी खुलासा केला आहे की ते पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात असतांना भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत त्यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यावेळी नागरिकांशी बोलत असतांना प्रदेश अध्यक्ष यांनी स्थानिक गांव गुंड मोदीला आपण बोलू शकतो आणि मारू शकतो असे बोलले होते. ते त्यांनी स्पष्ट ही केले होते.
तरीही भाजपवाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाशी व्हिडिओचा संबंध जोडून पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा मलिन करत आहेत. या दोन्ही नेत्यावर गुन्हा नोंदवून त्यांना पायबंद करावे कारण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचे काम ही मंडळी करत आहेत. तसेच भाजपचे नेते हे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांची नाहक बदनामी करुण राजकीय, सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचत आहेत. त्यांनी हे थांबविले नाही, तर महाराष्ट्र प्रदेश रोजगार व स्वंयरोजगार काँग्रेस कमिटी कदापि खपवून घेणार नाही जर तसी वेळ आलीच तर आम्हाला रस्त्यावर उतरून जशाच तसे उत्तर द्यावे लागेल. असा इशाराही देण्यात आला आहे.
काय म्हणाले होते नाना पटोले?
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नाना पटोले म्हणाले होते, मी का भांडतो? मी आता मागील ३० वर्षापासून राजकारणात आहे. लोक पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज विकत घेऊन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा घेतलेली नाही. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे. असे वक्तव्य नाना पटोले यांनी केली होते. त्यावरून आता मोठ्या प्रमाणात राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?”, मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
-
‘या’ तारखेला रंगणार भारत-पाकिस्तान सामना; भारताला वचपा काढण्याची संधी
-
राष्ट्रवादीने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी; अमोल कोल्हेंच्या भूमिकेवरून भाजपचे आव्हान
-
अखेर कालीचरण महाराज पोलिसांच्या ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
