मुंबई: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन आता नवा वाद रंगला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची भूमिका साकारल्याने वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. आता यावरूनच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Leader of Opposition Praveen Darekar) यांनी राष्ट्रवादीने आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान दिले आहे.
देशामध्ये कलाकार म्हणून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. अमोल कोल्हे हे केवळ अभिनेते नसून ते एका पक्षाचे सदस्य आहेत आणि लोकप्रतिनिधी व खासदार आहेत. त्यामुळे आता आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे. जनता आज विचारते आहे की, नेमकी राष्ट्रवादीची भूमिका काय आहे. हा कलाकार ज्यावेळी छत्रपतींची भूमिका साकारत होता, त्यावेळी मी ही भूमिका जगतोय, भूमिका प्रत्यक्षात वागतोय अशी वक्तव्ये आम्ही ऐकले आहेत. मग आता त्या कलेला, भूमिकेला न्याय देताना आपण तेच करणार आहात का? असा सवालही प्रवीण दरेकर यांनी केला आहे. यासंदर्भात कॉंग्रेसनेही भूमिका स्पष्ट केली आहे. हुसेन दलवाई यांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही म्हटले आहे की, अशाप्रकारची भूमिका घेणे चुकीचे आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेच आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
देशामध्ये कलाकार म्हणून प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र आहे. @kolhe_amol हे केवळ अभिनेते नसून ते एका पक्षाचे सदस्य आहेत आणि लोकप्रतिनिधी व खासदार आहेत. त्यामुळे आता आपल्या पक्षाची नेमकी भूमिका काय हे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे.(1/2) pic.twitter.com/JS60kn4Nq4
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) January 21, 2022
दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मात्र अमोल कोल्हेंची बाजू घेतली आहे. “खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हानात्मक भुमिका साकारली. एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली असेल याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही. रामायणात त्रिवेदी यांनी रावणाची साकारलेली भुमिका आठवा प्रत्यक्षात मात्र ते रामभक्त होते हे वास्तव आहे.” असे ट्वीट अमोल मिटकरी यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरेंनी पटकावले चौथे स्थान
- “झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?”, मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- ‘या’ तारखेला रंगणार भारत-पाकिस्तान सामना; भारताला वचपा काढण्याची संधी
- “एक अभिनेता म्हणुन त्यांनी नथुराम ची भुमिका पार पाडली, याचा अर्थ त्याचे समर्थन केले असे नाही”
- अखेर कालीचरण महाराज पोलिसांच्या ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ


