🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारायला काय अक्कल लागते, असा अप्रत्यक्ष टोला विरोधकांना लगावला होता. याला अनुसरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील वर्दळीच्या रस्त्यांवर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दिसत नाहीये. त्यामुळे पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी ट्विट करत झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?, असा सवाल केला आहे. तसेच त्यांनी एक कार्टून देखील शेअर केले आहे. ज्यामध्ये एक मुलगा त्याच्या आजोबांसह झेब्रा क्रॉसिंगजवळ उभा असून आबा..झेब्रा क्रॉसिंग कुठेय? असा प्रश्न विचारतोय. तर या प्रश्नावर त्याच्या आजोबांनी सरकारच्या कामांसोबत झेब्रा क्रॉसिंगही गायब झालय वाटतं, असे उत्तर दिले आहे.
झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?? pic.twitter.com/55ZXekEVsO
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 19, 2022
दरम्यान, १४ जाने.रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलत असतांना कोरोना काळात मुंबई महापालिकेने प्रचंड काम केलं. त्याचं कुणी घरच्यांनी कौतुक केलं नाही. कौतुक करण्यासाठी आपण काम करत नाही तर कर्तव्य म्हणून आपण काम करत असतो. आताच्या कार्यक्रमाची किती मोठी बातमी येईल हे माहीत नाही. उद्या कौतुक किती होईल त्याची अपेक्षा नाही. पण जरा कुठे खुट्टं झालं तर महापालिकेवर खापर फोडलं जातं. नगरसेवक काय करतात? महापौर काय करतात? अशी दुषणं दिली जातात. आयुक्त काय करतात… हे काय करतात?… ते काय करतात..? हे सगळं ठिक आहे. पण तू काय करतो हे सांग? असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलेच सुनावले होते.
महत्वाच्या बातम्या:
- अखेर कालीचरण महाराज पोलिसांच्या ताब्यात; जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला व्हिडीओ
- “समर्थ राष्ट्र म्हणून पाकिस्तान कधीच उभा राहू शकला नाही”
- “काही लोक देशप्रेम आणि बलिदान समजू शकत नाही”, अमर ज्योती विझवण्यावरून राहुल गांधींची टीका
- “दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणात सेवन केल्यास औषधासारखी असते”, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा अजब दावा
- पंतप्रधान मोदी ठरले आंतरराष्ट्रीय स्तरावरील लोकप्रिय नेते; अतुल भातखळकरांनी केले कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
