Share

‘या’ तारखेला रंगणार भारत-पाकिस्तान सामना; भारताला वचपा काढण्याची संधी

Published On: 

नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सामना म्हटलं की, अंगात एक प्रकारे जोश निर्माण करणारा दिवस असतो. ही लढत फक्त दोन संघांत नाही तर दोन देशातील नागरिकांमध्ये असते. आता हे पारंपारिक संघ वर्ल्डकपमध्ये एकमेकांशी झुंजणार आहेत. मागील वर्षी टी-२० वर्ल्डकपमध्ये (T20 World Cup) पाकिस्तानने भारताचा पराभव करत र्धेतील भारताच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच आव्हान दिले होते. आता याचाच वचपा काढण्याची संधी भारताकडे असणार आहे.

आयसीसीने टी-२० वर्ल्डकप २०२२ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार यंदाचा टी-२० वर्ल्डकप ऑस्ट्रेलियात होणार आहे. ही स्पर्धा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत खेळवली जाणार आहे. यामध्ये एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. यात सुपर-१२ राऊंडची सुरुवात २२ ऑक्टोबरपासून होणार आहे. त्यानुसार पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणार आहे. तर भारत-पाकिस्तान यांच्यात २३ ऑक्टोबरला सामना होणार आहे.

दरम्यान सुपर १२ मध्ये एकूण १२ संघ खेळताना दिसणार आहेत. या १२ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यापैकी ८ संघांची नावे निश्चित झाली आहेत. तर उर्वरित ४ संघ पहिल्या फेरीच्या निकालानंतर निश्चित होणार आहेत. दरम्यान भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना गट २ मध्ये स्थान मिळाले आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याची प्रेक्षकांना प्रचंड आतुरता असणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील भारत आणि पाकिस्तानमधील हा सातवा सामना असणार आहे. यापूर्वी झालेल्या ६ लढतींमध्ये भारताने ४ सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने केवळ एकदाच विजय मिळवला आहे. त्याचबरोबर दोन्ही संघांमधील एक सामना बरोबरीत सुटला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!