Share

“दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणात सेवन केल्यास औषधासारखी असते”, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरचा अजब दावा

Published On: 

नवी-दिल्ली : नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर(Pradnya Singh Thakur) या पुन्हा एकदा आपल्या अजब वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनल्या आहेत. दारू स्वस्त असो किंवा महाग कमी प्रमाणात सेवन केल्यास ती औषधासारखी असते, असा अजब दावा प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना ठाकूर म्हणाल्या की,’दारु स्वस्त असो किंवा महाग आयुर्वेदामध्ये दारु कमी प्रमाणात असेल तर ते औषध असतं आणि दारुचे प्रमाण असिमित असेल तर ते विष असते.’ तसेच या गोष्टीला सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. जास्त प्रमाणात दारुचे सेवन करणाऱ्यांनी ते बंद केलं पाहिजे, असेही ठाकूर यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, यापूर्वी देखील अशाच एका वक्तव्यामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर चर्चेत आल्या होत्या. पेट्रोल डिझेल महाग झाले आहे, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र तसे काही नसून काँग्रेस कार्यकर्त्यांची ती मानसिकता आहे, असे ठाकूर म्हणाल्या होत्या.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!