🕒 1 min read
मुंबई : आज सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांची जयंती. यानिमित्ताने सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. याची माहिती स्मृति ईरानी यांनी ट्विट करत दिली आहे.
स्मृति ईरानी ट्विट करत म्हणाल्या, ‘महिलांचे शिक्षण आणि स्री-पुरुष समानता, यासाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या, स्री मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या, देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनंम्र अभिवादन. महिला सशक्तिकरणासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहेत.’ असे स्मृति ईरानी म्हणाल्या.
महिलाओं की शिक्षा एवं उनके सम्मान हेतु आजीवन कार्य करने वाली नारी मुक्ति आंदोलन की प्रणेता, देश की पहली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले जी की जयंती पर उन्हें शत्-शत् नमन।
महिला सशक्तिकरण के लिए उनके द्वारा किए गए प्रयास सम्पूर्ण समाज के लिए प्रेरणादायी है। pic.twitter.com/KyT5T1I15e
— Smriti Z Irani (@smritiirani) January 3, 2022
सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यामुळे भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून त्यांची ओळख झाली. यासह विविध अनिष्ट रुढी परंपरांबाबत त्यांनी जनजागृतीही केली. सावित्रीबाई फुले या समाजसेविका आणि शिक्षिका होत्या. ज्यांनी शिक्षण मिळवून केवळ समाजातील वाईट प्रवृत्तींचाच पराभव केला नाही, तर जेव्हा समाजात अनेक प्रकारचे लिंगभेद होते अशा वेळी भारतातील मुलींसाठी शिक्षणाची दारे उघडण्याचे महान काम केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल, यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय?
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना “भारतरत्न” मिळाला पाहिजे- रुपली पाटील ठोंबरे
- आजपासून देशात १५ ते १८ वयोगटातील लसीकरणास सुरवात
- “मोदीजी आता चीनची वाट लावणार, त्यांचे डोळे बघा लाल…”, सचिन सावंतांची खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
