नवी दिल्ली: देशातील १५ ते १८ वर्ष वयोगटातील (Children between the ages of 15 and 18) मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून म्हणजेच ३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. (starting vaccination from today) दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करता येणार आहे. तर नोंदणीसाठी इयत्ता दहावीचे ओळखपत्रदेखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे.
दरम्यान रविवारी ११ वाजेपर्यंत ८ लाख मुलांकडून लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली. अशी माहिती कोवीन प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ आर एस शर्मा यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदींनी १५ ते १८ वयोगटातील मुलांनी लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान लसीकरणासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल वेगळी असणार आहे.भारत सरकारने लहान मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे.भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila’s ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे. दरम्यान रजिस्ट्रेशनसाठी पूर्वीसारखीच पद्धत वापरली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल अशा विध्यार्थ्यांना त्यांचे शाळेचे ओळखपत्र देखील वापरता येणार आहे. https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
- एका जिल्हा बँकेवरील विजयाने सत्ता परिवर्तन होईल, यास भाकडकथा नाही म्हणायचे तर काय?
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना “भारतरत्न” मिळाला पाहिजे- रुपली पाटील ठोंबरे
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

