मुंबई : सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. यानिमित्ताने सर्व स्तराहून सावित्रीबाईंना अभिवादन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांनी ट्विटच्या माध्यमातून सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विटमध्ये भुजबळ म्हणाले आहेत की,’भारतातील स्त्री शिक्षणाची ‘ज्ञानगंगोत्री’ आणि महात्मा जोतीराव फुले यांना ‘सत्यशोधक’ मार्गात तोलामोलाची साथ देणाऱ्या क्रांतिज्योती.एस.टी. कंडक्टरपासून ते अंतराळ यात्रीपर्यंत आत्मविश्र्वासानं वाटचाल करणाऱ्या व स्त्रीशक्तीच्या आजच्या बहुतांशी सुखावह झालेल्या जगण्यामागे सावित्रीबाईंच्या त्यागाचा इतिहास आहे.’
भारतातील स्त्री शिक्षणाची ‘ज्ञानगंगोत्री’ आणि महात्मा जोतीराव फुले यांना ‘सत्यशोधक’ मार्गात तोलामोलाची साथ देणाऱ्या क्रांतिज्योती.एस.टी. कंडक्टरपासून ते अंतराळ यात्रीपर्यंत आत्मविश्र्वासानं वाटचाल करणाऱ्या व स्त्रीशक्तीच्या आजच्या बहुतांशी सुखावह झालेल्या जगण्यामागे pic.twitter.com/DrOvHmZ9Ni
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 2, 2022
दरम्यान, महात्मा फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातूनही केला.इ.स. १८९६ च्या दुष्काळात माणूसकी विसरून एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला. असामान्य जीवन जगणाऱ्या ज्ञानगंगोत्री सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन, असे भुजबळ ट्विटमध्ये म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘मी अजित दादांचा फॅन’; भाजप आमदाराने कौतुक करताच राष्ट्रवादीची ऑफर
- पहिल्या किसान रेल्वेच्या उद्घाटन कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन
- ओमायक्रॉनबाबत दिलासादायक बातमी; जाणून घ्या काय म्हणाले AIIMS चे संचालक
- मराठवाड्यातील जनतेला नववर्षाच्या सुरुवातीला रावसाहेब दानवेंनी दिले ‘हे’ गिफ्ट..!
- ‘सत्तेची खुर्ची डळमळली तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; आशिष शेलारांची टीका


