🕒 1 min read
Jayakumar Gore । फलटण : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नियोजित ‘भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन’ला सुरवात झाली आहे. यावरुन भाजपने बारामतीला दिलेले राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे. दुसरीकडे आता भाजप नेते यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. यावरून आता भाजपचे सातारा जिल्हाअध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनी जोरदार टोला लगावला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याची सुरुवात करताना ते फलटण तालुक्यातील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र, कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीत (NCP) बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र, एकदम ओक्केच, असं म्हणत त्यांनी पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना टोला लगावला.
पुढे गोरे म्हणाले, देश आणि राज्य प्रगतीपथावर नेणार्या भाजपावर जनतेचा मोठा विश्वास आहे. विरोधी पक्षातील अनेकजण भाजपचे कमळ हाती घेत आहेत. आता फलटण तालुक्यातील भाकरी फिरवायची वेळ आली आहे. सगळीकडे एकाच कुटुंबातील व्यक्ती विविध पदे भूषवत आहेत. रामराजेंची घराणेशाही तालुक्यात सुरु असल्याने कुवत असणार्या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यांनी सामान्य माणसाला कधी संधीच दिली नाही. इथल्या जनतेला आता आर-पारची लढाई लढून तालुक्यात आमदारकीपासून जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगपालिकेतही बदल करायची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Jio Prepaid Recharge | एअरटेल चे टेन्शन वाढले! कारण जिओ देत आहे 155 रिचार्जमध्ये संपूर्ण महिना इंटरनेट..
- Raj Thackeray | 5 दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर रेल्वेने निघालेले राज ठाकरे नागपुरात दाखल
- IND vs AUS | भारतीय संघाला मोठा झटका, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 मालिकेतून हा वेगवान गोलंदाज बाहेर
- Lips Hacks | ‘या’ नैसर्गिक पद्धतीने शस्त्रक्रियेविना ओठ बनवा फ्लफी..जाणून घ्या!
- Sharad Pawar | “एकच मुलगी मग अग्नी कोण देणार?”, प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
