मुंबई : सध्या राज्यातील राजकीय वातावरण खूपच तापलं आहे. अशातच शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद खूपच टोकाला गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या तीन-चार दिवसांपासून शिवसेना पक्षाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे लगातार शिंदे गटावर आणि त्यातील नेत्यांवर आरोप,टीका करत करताना दिसून येतं आहे. अशातच त्यांच्याच संबंधी एक माहीती समोर आली आहे. चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं समजतं आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?
चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर टीका करताना त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली होती. त्यावरून सातारा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत खैरे यांनी आनंद दिघे असते तर त्यांना उलटं टांगलं असतं. ते गेल्यानंतर यांच्यात काय काय सुटलं हे राजन विचारे यांना किंवा तेथील शिवसैनिकांना विचारा, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाविरोधात केलं होतं.
तसेच, चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याच्या आधी काही तास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना शिवसैनिकांना धमक्या जात असल्याचा दावा केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, शिवसैनिकांना धमक्या दिल्या जात असून, तुमच्यावर केसेस करू, तडीपार करू अशा धमक्या देण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे. 40 डोक्याच्या रावणाने रामाचं धनुष्यबाण गोठवलं. गोठलेल्या रक्ताची माणसेच अशी कृत्य करतात ज्या शिवसेनेने मोठे केल, तिचाच घात करण्यात आला. धनुष्यबाण गोठवल्याचा आनंद महाशक्तीला आता खूप होत असेल, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच!
- Uddhav Thackeray | “उलट्या काळजाच्या माणसांनी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे”
- Eknath Shinde । कुणीही कायदा हातात घेऊ नका; मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेची मंत्री आणि आमदारांना सूचना
- Shivsena । ४० डोक्याच्या रावणाने प्रभू श्रीरामाचे धनुष्यबाण गोठवले; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर टीकास्त्र
- Uddhav Thackeray । तुमची बुद्धी गोठली नसेल तर बाळासाहेबांचं नाव वापरु नका : उद्धव ठाकरे


