सातारा : राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु असतानाच आज शिरवळ येथील नीरा नदीपात्रात त्यांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. तसेच घोरपडे यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
सीसीटिव्ही फुटेजमध्ये समोर आलं सत्य –
२ ऑक्टोबर रोजी शशिकांत घोरपडे पुण्याहून साताऱ्याला निघाले होते. मात्र, दुपार नंतर त्यांचा कोणाशीच काहीच संपर्क झाला नाही. यानंतर १३ तारखेला पाहटे त्यांच्या नातेवाईकांनी तक्रार नोंदवली. तक्रार नंतर एका सीसीटिव्ही फुटेजमध्ये घोरपडे दिसले.
शिकांत पतंगराव घोरपडे यांचा नदीपात्रात मृतदेह –
समोर आलेल्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये पुण्याहून पुढे आल्यावर त्यांनी सारोळा गावाजवळ गाडी उभी केली. तिथून पुढे ते चालत नीरा नदीच्या दिशेने चालत गेले. त्यामुळे नीरा नदीत युद्धपातळीवर त्यांचा शोध सुरु होता. अशातच त्यांचा मृतदेह नदीपात्रात सापडल्याने खळबळ उडाली आहे.
दरम्यान, समोर आलेल्या सीसीटिव्ही फुटेजवरुन शशिकांत घोरपडे यांनी आत्महत्या केली असल्याचं दिसून येत आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये.
महत्वाच्या बातम्या :
- PM Kisan Yojana : शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार! ‘या’ तारखेला मिळणार पीएम किसान योजनेचा 12 वा हप्ता
- Andheri By Election | अंधेरी पोटनिवडणूक ऋतुजा लटके एकतर्फी जिंकतील ; राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची प्रतिक्रिया
- Eknath Khadse | “रश्मी शुक्ला जेव्हा फडणवीसांना भेटल्या तेव्हाच त्यांना…”, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
- Gold Silver Price Update | या सणासुदींच्या दिवसांमध्ये सोन्याच्या खरेदीपेक्षा चांदीच्या खरेदीत वाढ, जाणून घ्या 24 कॅरेट सोन्याचे भाव
- Girish Mahajan । “मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय”; व्हायरल ऑडिओ क्लिपवर गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण


