Share

Jayakumar Gore । राष्ट्रवादीत बारामती, फलटणकरांची घराणेशाही एकदम ओक्केच; जयकुमार गोरेंचा टोला

Published On: 

🕒 1 min read

Jayakumar Gore । फलटण : २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची तयारी भाजपने आतापासूनच सुरु केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात नियोजित ‘भाजप बारामती लोकसभा मतदारसंघ मिशन’ला सुरवात झाली आहे. यावरुन भाजपने बारामतीला दिलेले राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे. दुसरीकडे आता भाजप नेते यावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर निशाणा साधत आहेत. यावरून आता भाजपचे सातारा जिल्हाअध्यक्ष आणि आमदार जयकुमार गोरे यांनी जोरदार टोला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून सुरु झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याची सुरुवात करताना ते फलटण तालुक्यातील मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र, कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीत (NCP) बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र, एकदम ओक्केच, असं म्हणत त्यांनी पवार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना टोला लगावला.

पुढे गोरे म्हणाले, देश आणि राज्य प्रगतीपथावर नेणार्‍या भाजपावर जनतेचा मोठा विश्वास आहे. विरोधी पक्षातील अनेकजण भाजपचे कमळ हाती घेत आहेत. आता फलटण तालुक्यातील भाकरी फिरवायची वेळ आली आहे. सगळीकडे एकाच कुटुंबातील व्यक्ती विविध पदे भूषवत आहेत. रामराजेंची घराणेशाही तालुक्यात सुरु असल्याने कुवत असणार्‍या सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यांनी सामान्य माणसाला कधी संधीच दिली नाही. इथल्या जनतेला आता आर-पारची लढाई लढून तालुक्यात आमदारकीपासून जिल्हापरिषद, पंचायत समिती व नगपालिकेतही बदल करायची वेळ आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!