Share

Eknath Shinde | “ज्यांच्याकडे काही काम नाही ते…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा कुणावर?

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | सातारा : शिवप्रताप दिनानिमित्ताने प्रताप गडावर नेत्रदिपक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवप्रेमींना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनाची गरज असून त्यासाठी नव्या दुर्ग प्राधिकरणाची स्थापना केली जाईल, अशी घोषणा केली.

तसेच त्यांनी प्रतापगडाच्या संवर्धनासाठी २५ कोटी रुपयांची निधी देण्याचे जाहीर केले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना पक्षातील बंडखोरीवरही भाष्य केले. जनतेच्या जे मनात होते तेच आम्ही केलेले आहे. ज्यांनी ३७० कलम हटवले, अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम केले त्यांच्याशी आम्ही युती केली असेही शिंदे म्हणाले.

“हे सरकार आल्यामुळे राज्यात सण मोठ्या उत्त्साहात साजरे केले जात आहेत. परिवर्तन घडले नसते तर आज एवढा उत्साह नसता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने हे सत्तापरिवर्तन झाले आहे. ज्यांच्याकडे काही काम नाही, ते आरोप करत असतात. आम्ही आरोप करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार आहोत,” असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

“शेतकऱ्यांचा पुत्र मुख्यमंत्री होऊ शकत नाही का?”, असा सवाल त्यांनी केलाय. “सर्वसामान्य कुटुंबातील एक व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याचे अनेकांना रुचत नाहीये. आम्ही जेथे-जेथे जातोय तेथे अनेक लोक आमच्या स्वागतसाठी उभे आहेत. राज्यात सरकार बदलल्यामुळे चांगली कामे सुरू आहेत, अशा भावना लोक व्यक्त करत आहेत,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!