Share

“मोदीजी आता चीनची वाट लावणार, त्यांचे डोळे बघा लाल…”, सचिन सावंतांची खोचक टीका

Published On: 

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार दि २ जानेवारी रोजी उत्तरप्रदेशमध्ये मेजर ध्यानचंद खेळ विद्यापीठाचे लोकार्पण केले. यावेळी त्यांनी उपलब्ध सुविधांची पाहणी केली. यानंतर विद्यापीठातील जिममध्ये त्यांनी व्यायाम केला. पंतप्रधान मोदींचा व्यायाम करतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी खोचक टीका केली आहे.

याबाबत सचिन सावंत ट्विट करत म्हणाले, ‘मोदीजी आता चीनची वाट लावणार आहेत. त्यांची तयारी बघा किती जोरात सुरु आहे. त्यांचे डोळे आता लाल होणारच आहेत.’ अशी खोचक टीका सावंतांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी उत्तरप्रदेश दौऱ्यावर आहेत. मेरठ शहरात मेजर ध्यानचंद खेळ विद्यापीठाचे लोकार्पण त्यांनी केले. या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह इतर नेते हजर होते. विद्यापीठ लोकार्पण कार्यक्रमात विविध खेळांचे स्टॉल लावण्यात आले होते. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी स्टॉलवर विविध खेळांची माहिती घेतल्यानंतर विद्यापीठातील जिममध्ये व्यायाम केला. यातून त्यांनी ‘फिट इंडिया’ चा संदेश दिला. त्यानंतर पंतप्रधानांनी जाहीर सभेत भाषण केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!