🕒 1 min read
मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रविवारी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. गोपीचंद पडळकर यांनी एका व्हिडीओतून माझ्यावर हल्ला करण्यामध्ये जयंत पाटील यांचा सहभाग होता असा आरोप केला. हा मुद्दा सभागृहामध्ये उपस्थित केला गेला. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात तुफान खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
हा हल्ला सुनियोजित होता, माझी गाडी ज्या दिशेने येत होती त्याच्या बरोबर दुसऱ्या बाजूने 200 ते 300 लोकांचा जमाव लाठ्या काठ्यांसह उभा होता असा आरोप पडळकर यांनी केला आहे. याच मुद्द्यावरुन विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा मुद्दावरुन देवेंद्र फडणवीस हे चांगलेच आक्रमक झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून गोपीचंद पडळकरांच्या हत्येचा कट केला असल्याचा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
फडणवीसांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन मी कालच सिंधदुर्गामध्ये बोललो होते की, कोणत्याही व्यक्तीवर अशा प्रकारचा हल्ला होऊ नये त्या व्यक्तीला संरक्षण देणे ही आमच्या सरकारची जबाबदारी आहे. मात्र राज्यातील सर्व जनतेने एका गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले आहेत.
सगळा महाराष्ट्र मला ओळखतो मी 30 वर्षे राजकारणात आहे. काही जण म्हणतात अजित पवारांच्या हातात जबाबदारी दिली तर 4 दिवसात राज्य विकून खाईल. अरे काय बोलता, काय पद्धत झाली का ही? आज मी कोणाच्या आध्यात मध्यात नसतो. मी फक्त विकासकामाबाबत बोलत असतो. कोणत्याही पक्षाचे लोक आले आणि ते सार्वजनिक काम महत्वाचं असलं तर मनापासून लक्ष घालतो. यश मिळत असेल नसेल पण मनापासून लक्ष घालतो. आपल्याला लोकांचे प्रतिनिधी म्हणून सभागृहामध्ये पाठवलं आहे. त्यामुळे थोडंस तारतम्य ठेवून बोललं वागलं पाहिजे, असं म्हणत अजित पवारांनी विरोधी पक्षाला सुनावलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘या’ विषारी वृत्तीला लवकर अटक करा; जितेंद्र आव्हाडांची मागणी
- मविआ सरकार प्रत्येक विषयात घालत असलेल्या गोंधळावर पीएचडी करता येईल- चंद्रकांत पाटील
- विधानसभेत पुन्हा गदारोळ: “तो चाऊन येणारा कुत्रा म्हणजे भास्कर जाधव”
- नितेश राणेंच्या अटकेबाबत संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
- नितेश राणे संदर्भात सरकारला काय करायचे ते करावं-नारायण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
